वाचा:
अमित ठाकरे यांना सर्दी आणि ताप वाटत असल्याने त्यांची करोना चाचणी करून घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काहीशी चिंता निर्माण झाली होती. त्यानंतर २० एप्रिल रोजी त्यांना लगेचच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे गेले चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांनी त्यांना आता बरे वाटू लागले आहे. ताप नसल्याने व सर्दी कमी झाल्याने त्यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे. करोनाची लक्षणे कमी झाल्यानेच त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाचा:
अमित यांना घरी सोडले असले तरी पुढचे १४ दिवस त्यांना घरीच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. आता पुढचे १४ दिवस त्यांना डॉक्टरांनी सांगितल्यानुसार कोविडबाबतचा दिनक्रम फॉलो करावा लागणार आहे. १४ दिवसांच्या विलगीकरणानंतरच ते इतरांना भेटू शकणार आहेत. राज ठाकरे यांच्या घरातील अन्य कुणालाही करोनाची लागण झालेली नाही. अमित यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील इतरांनीही चाचणी करून घेतली मात्र सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ठाकरे कुटुंबात याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर मात केली आहे. दोघांचीही प्रकृती आता उत्तम आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times