देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आपल्या राज्याला ऑक्सिजनची अधिक गरज होती आणि ती भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्वांनी प्रयत्न केले, असे पवार म्हणाले. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी देखील चर्चा केली. त्यानंतर ऑक्सिजन टँकर विमानातून नेण्याची परवानगी देण्यात आल्याचे ते म्हणाले. रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी देण्यात आली असून भरलेले टँकर रेल्वे आणि रस्तेमार्गे आणण्यात येतील, अशी महत्वाची माहितीही त्यांनी दिली आहे.
‘लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार’
करोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विचार करता बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण रुग्णालयांमध्ये येत आहेत. आम्ही काही निर्णय लाँग टर्मसाठीही घेत आहोत. केंद्र सरकारने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांवर जबाबदारी दिली आहे. त्यासाठी आम्ही ५ सदस्यीय समिती बनवत आहोत. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लशीचा विचार करण्यात येत आहे. या टेंडरमध्ये सर्व कंपन्यांच्या लशींना परवानगी देण्यात येत आहे. लस सीरमची असो, भारत बायोटेकची असो, फायजरची असो, अशा सर्व लशींचा ग्लोबल टेंडरमध्ये उल्लेख असणार आहे, असे पवार पुढे म्हणाले. १ मे पासून अर्थात महाराष्ट्र दिनापासून राज्यात लसीकरण सुरू करण्याची राज्याची तयारी आहे, असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील बंद पडलेले ऑक्सिजनचे प्लांट आम्ही सुरु करत आहोत. यांपैकी काही प्लांट वीजेअभावी, तर काही आर्थिक स्थितीमुळे बंद होते. ते आता सुरु होतील. त्याच प्रमाणे साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तशा सूचना शरद पवार यांनी दिल्याचेही अजित पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times