वाचा:
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करणारे पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने मार्फत देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल केला असून विविध पथकांनी एकाच दिवशी देशमुख यांच्या १० ठिकाणांवर छापे टाकले आहेत. पीपीई किटमध्ये सीबीआयचे एक पथक सकाळी नागपूर येथील देशमुख यांच्या घरी पोहचले होते.
वाचा:
सीबीआयच्या पथकाने देशमुख यांच्या घरात कसून तपासणी केली. जवळपास ११ तास हे अधिकारी देशमुख यांच्या घरात होते. या पथकाने काही वस्तू ताब्यातही घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तपासानंतर सीबीआय पथक घराबाहेर पडले असता माध्यमांनी गराडा घातला. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया न देता हे अधिकारी निघून गेले. त्यानंतर काही वेळातच फेसशिल्ड घालून अनिल देशमुख घराबाहेर आले व त्यांनी माध्यमांना थोडक्यात प्रतिक्रिया दिली. सीबीआय पथकाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर एक ट्वीटही देशमुख यांनी केले आहे. ‘सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी करोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे’, असे देशमुख यांनी या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times