वरिनाच्या या घोषणेने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वरिनाने मागील वर्षीदेखील सोशल मीडियापासून एका महिन्याचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती सोशल मीडियावर परतली होती. नुकतीच एक पोस्ट शेअर करत वरिनाने म्हटलं, ‘मला आठवतंय मी कुठेतरी वाचलंय की तुमच्या जाण्याची घोषणा इथे करू नका कारण हे काही विमानतळ नाही. पण मी माझ्या जाण्याची घोषणा करणार आहे ते सुद्धा माझ्या चाहत्यांसाठी आणि मित्रांसाठी ज्यांनी मला इतकं प्रेम दिलं. ही माझी शेवटची मीडिया पोस्ट आहे, यानंतर माझं अकाउंट सुरू राहील आणि माझी टीम माझ्या कामाबद्दल यावर पोस्ट करेल.’
त्यासोबतच तिने कॅप्शन देत लिहिलं, ‘आमिर सरांच्या भाषेत सांगायचं तर अजून ढोंग नाही करू शकत.’ असं म्हणत तिने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. वरिनाने ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यात ती आयुष शर्मा सोबत दिसली होती. त्याचप्रमाणे ती ‘दबंग ३’ मध्ये सलमान खानसोबत थिरकाताना दिसली होती. सध्या ती ‘द इनकम्पलीट मॅन’ चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times