मुंबई: राज्यात करोनाचे थैमान कायम आहे. गेल्या २४ तासांत ६७ हजार १६० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ६२ हजार ८१८ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान, आज ६७६ रुग्ण करोनाने दगावले असून आतापर्यंत ६३ हजार ९२८ जणांचा या संसर्गाने बळी घेतला आहे. ( )

वाचा:

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात काही प्रमाणात यश येऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी दररोज मोठ्या संख्येने होत असलेली रुग्णवाढ रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याचवेळी गेले काही दिवस मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे.

वाचा:

राज्यातील करोनाची आजची आकडेवारी

– राज्यात आज ६७६ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.५१% एवढा आहे.
– आज राज्यात ६७ हजार १६० नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ६३ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आजपर्यंत एकूण ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्ण करोनामुक्त.
– रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ८२.०२ टक्के.
– आतापर्यंत २ कोटी ५४ लाख ६० हजार ८ कोविड चाचण्या पूर्ण.
– ४२ लाख २८ हजार ८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.
– सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये.
– २९ हजार २४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.

वाचा:

मुंबई, पुण्यात रुग्णसंख्येत घट

राज्यात करोनाचे सध्या ६ लाख ९४ हजार ४८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात आणि जिल्ह्यातील आकडा गेल्या दोन दिवसांपासून खाली येताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात सध्या १ लाख ८ हजार २३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबई पालिका क्षेत्रात ७८ हजार २२६ रुग्ण आहेत. व जिल्ह्यातील आकडे चिंता वाढवणारे आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या ८० हजार ४९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नागपूरमध्ये हा आकडा ८० हजार ८७ इतका आहे. मुंबईत ५ हजार ८६७, नागपूर पालिका क्षेत्रात ५ हजार ४१७, पुणे पालिका क्षेत्रात ४ हजार ११८ तर ठाणे पालिका क्षेत्रात आज १ हजार १६३ नवीन रुग्णांची भर पडली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here