वाचा:
भारतात सीरम आणि यांच्याकडून कोविड वरील लसींचे उत्पादन घेतले जाते. सीरमने नुकताच आपल्या कोविशील्ड या लसचा दर जाहीर करताना राज्यांसाठी ४०० रुपये प्रतिडोस तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रतिडोस असा दर निश्चित केला होता. त्या दरांवरून मोठं वादळ उठलं असताना आता भारत बायोटेकने सीरमपेक्षाही अधिक दर कोव्हॅक्सिनसाठी निश्चित केल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
वाचा:
सीरमने आपल्या एकूण लस उत्पादनापैकी ५० टक्के भाग केंद्र सरकारसाठी राखीव ठेवला आहे. केंद्राला यापुढेही १५० रुपये या दरानेच लस पुरवठा केला जाणार आहे. तसाच निर्णय भारत बायोटेकनेही घेतला असून केंद्राला १५० रुपये या दरानेच यापुढेही कोव्हॅक्सिन देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रासाठी ५० टक्के साठा राखीव असेल तर उर्वरित ५० टक्के साठ्यातून राज्यांना तसेच खासगी रुग्णालयांना लस पुरवठा केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार हे दर निश्चित करण्यात आल्याचे भारत बायोटेकने नमूद केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times