मुंबई : राज्यात इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधान यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानंतर सूत्रे हलली असून आज केंद्र सरकारने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार व्हायल्स करण्यात आला आहे. ( Maharashtra )

वाचा:

आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव यांचे यासंदर्भातील पत्र राज्य सरकारला प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की, २१ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे. यात महाराष्ट्राला ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा होणार असल्याने खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा:

दरम्यान, वरील उपचारात रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी अचानक वाढली असून परिणामी तुटवडाही निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील कोविड रुग्णांचा सध्याचा आकडा पाहता रेमडेसिवीरचा उपलब्ध साठा फारच कमी होता. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने केंद्रापुढे मांडली. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही मुख्यमंत्री ठाकरे यांनी रेमडेसिवीरचा मुद्दा उपस्थित केला होता. रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिवीरमुळे कमी होत आहे. परिणामी ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी करण्यास मदत होवू शकते. महाराष्ट्राला सध्या दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र, दररोज २७ हजार व्हायल्स उपलब्ध आहेत. त्यासाठी रेमडेसिवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. परदेशातून रेमडेसिवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here