यवतमाळ: संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशील असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला. येथील आयटीआय कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल ३० करोना बाधित रुग्णांनी पलायन केले. दरम्यान, यापैकी काही रुग्णांना शोधून आता गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी घडला. ( )

वाचा:

जिल्ह्यात दररोज करोना बाधितांची संख्या सरासरी एक हजाराने वाढत आहे. शनिवारी घाटंजी तालुक्यात ४५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. दरम्यान सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येते. शुक्रवारी तालुक्यातील आमडी येथे करोना चाचणी शिबीर घेण्यात आले. या ठिकाणी १७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांना घाटंजी येथे आयटीआय कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

वाचा:

दरम्यान, शनिवारी मधून ३० करोना बाधित पळून गेल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालची जमीन सरकली. पलायन केलेले रुग्ण कोणत्या एका गावातील आहेत की, अनेक गावातील हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तालुका आरोग्य यंत्रणेने या रुग्णांचा गावागावात आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक,अंगणवाडी व आशा सेविका यांच्यामार्फत शोध घेणे सुरू केले आहे. पलायन केलेल्यांपैकी सापडलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरची जबाबदारी असलेले आरोग्य अधिकारी डॉ. संजय पुराम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वाचा:

संबंधितांविरोधात कारवाई करणार: जिल्हाधिकारी

घाटंजी कोविड केअर सेंटरमध्ये घडलेला प्रकार संतापजनक आहे. या पद्धतीने वर्तन राहिल्यास जिल्ह्यात संसर्ग आणखी वाढेल. त्यामुळे पळून गेलेल्या रुग्णांविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. याप्रकरणात दोषी असणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा दुजोरा

घाटंजी येथील कोविड केअर सेंटरमधून २० करोना बाधितांनी पलायन केल्याची माहिती प्राप्त झाली आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी सांगितले. अधिक माहिती घेतली जात सुरू असून, याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे, असे डॉ. पवार म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here