‘पुणे शहर आणि महाराष्ट्र कठीण परिस्थितीतून जात आहे. महाराष्ट्राला करण्यासाठी सर्वांना मिळून काम करावे लागणार आहे. मी देशासाठी खूप खेळलो; पण आता देशासाठी सामाजिक काम करण्याची वेळ आली आहे. आपल्याला करोनाविरुद्धचा सामना जिंकायचा आहे,’ असे प्रसिद्ध फिरकीपटू याने शनिवारी सांगितले.
हरभजनसिंगने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या चाचणी व्हॅनचे लोकार्पण शनिवारी वडगाव शेरी येथील पुण्यनगरी सोसायटीत झाले. हरभजनसिंग या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाला होता.
चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बीडकर, राजेश पांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश करपे उपस्थित होते.
‘नागरिकांनी वेळेत उपचारासाठी चाचणी लवकर करावी या हेतूने चाचणी वाहन उपलब्ध करून देत आहे,’ असे सांगून हरभजनसिंगने
करोनाविरुद्धच्या लढ्यात चंद्रकांत पाटील आमचे कर्णधार असल्याची उपाधी दिली.
‘जीवन हा खेळ आहे. थोडा वेळ खेळायचे आणि निघून जायचे, असे प्रवचनकारांकडून ऐकत होते. आता ते पाहत आहे. ऑक्सिजन पाहिजे म्हणून मंत्री आणि अधिकारी डोक्याला हात लावून बसले आहेत. या चाचणी वाहनामुळे वेळेत निदान होण्यास मदत होईल.
रोज सहा हजार अँटिजन आणि दीड हजार आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातील. आरोग्य विषयक सकारात्मक माहिती देणारा स्वतंत्र डॅशबोर्ड शहर भाजपतर्फे सुरू होणार आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times