आयपीएमधील गुणक्त्यातील पहिल्या दोन संघांमधील या लढतीत जो विजय मिळवेल त्याला अव्वल स्थान मिळेल. आरसीबी ८ गुणांसह अव्वल स्थानी असेल तरी चेन्नईची सरासरी त्यांच्यापेक्षा चांगली आहे. त्यामुळे आज चेन्नईने विजय मिळवल्यास ते अव्वल स्थानी पोहोचू शकतील.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी संघात तसा लगेच बदल करत नाही. जर संघ विजय पथावर असेल तर धोनी कोणत्याही परिस्थीतीत संघात बदल करत नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात धोनी अंतिम ११ मध्ये कोणता बदल करेल असे वाटत नाही. गेल्या सामन्यात धोनीने ब्राव्होच्या जागी लुंगी एगिडीला स्थान दिले होते. या सामन्यात देखील गोलंदाजीत दीपक चहर, एगिडी, शार्दुल ठाकूर आणि सॅम करन हे गोलंदाजीची धुरा संभाळतील.
विराट कोहलीने पहिल्या सामन्यानंतर काही बदल केले होते. पण विजय मिळत असताना विराटने संघात कोणताही बदल केला नाही. सध्या आरसीबीचा संघ उत्तम आहे. फलंदाजी, ऑल राउंडर आणि गोलंदाजीत संघात समतोल आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सलग पाचवा विजय मिळवल्यास आश्चर्य वाटू नये. करोनावर मात करून संघात दाखल झालेल्या डॅनिय्र सॅम्सला केन रिचर्डसनच्या जागी संधी दिली जाऊ शकते.
संभाव्या संघ
चेन्नई सुपर किंग्ज- ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार), सॅम करन, रविंद्र जडेजा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, लुंगी एगिडी
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेम मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, डॅनिअल सॅम्स, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times