मुंबईः देशातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं स्थिती बिकट होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ”च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर जोरदार टोला हाणला आहे.

‘मन की बात’च्या माध्यमातून मोदींनी अनेक आरोग्य तज्ज्ञ, लॅबमधील तंत्रज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. हाच धागा पकडत काँग्रेस नेते यांनी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच, मोदी पत्रकार परिषद कधी घेणार?, देशाला उत्तरे कधी मिळणार?, असा खोचक सवाल चव्हाण यांनी केला आहे.

अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, करोनाबाबत लोकांनी वेळीच नेमकी काय उपाययोजना करावी, यावर ‘मन की बात’मध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स चालक आणि रुग्णांसोबतही प्रश्नोत्तरे झाली. स्वागत आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. शिवाय, करोनाबाबत केंद्रानं वेळीच नेमकी काय उपाययोजना केली, यावर पत्रकार परिषद कधी घेणार? देशाला उत्तरे कधी मिळणार?, असे सवालही त्यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

करोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी लस महत्त्वाची आहे. लसीकरण महत्त्वाचं आहे. पण लसीबाबत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा मोफत पुरवठा केला जात आहे. करोनाच्या या संकटात केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here