मुंबई– देशात करोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते आहे. सरकार परिस्थिती गंभीररीत्या हाताळत आहे. स्मशानभूमी समोर अंतिम संस्कारासाठी मृतदेहांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजन, बेड आणि औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक पुढाकार घेऊन इतरांची सेवा करण्याचं काम देखील करत आहेत. नुकतेच बॉलिवूड अभिनेता याने गरजवंतांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.

माजी भारतीय क्रिकेटर आणि दिल्लीचे संसद सदस्य असलेले यांनी ट्विट करत या संबंधी माहिती दिली आहे. गौतम यांची दिल्लीत एक संस्था असून ते या संस्थेतर्फे अनेक गरजवंतांची मदत करतात. त्यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती देत म्हटलं, ‘सध्याच्या वाईट परिस्थितीत प्रत्येक मदत एक आशेचा किरण आहे. अक्षय कुमार यांचे मी खूप आभार मानतो कारण त्यांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी गौतम गंभीर फाउंडेशनमध्ये एक कोटी रुपये देण्याचं वचन दिलं आहे.’ अक्षयने दिलेले हे पैसे गरजूंच्या जेवणासाठी, औषधांसाठी आणि ऑक्सिजनसाठी वापरले जाणार आहेत. अगोदर हे पैसे गौतम गंभीर फाऊंडेशन मध्ये जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर ते लोकांच्या मदतीसाठी वापरले जाणार आहेत.

गौतमदेखील दिल्लीमधील अनेक गरजू लोकांची मदत करत आहेत. ते स्वतः करोनाग्रस्त लोकांची मदत करत आहेत. अनेक लोक गौतम यांच्याकडे ऑक्सिजन आणि बेडसाठी मदत मागत आहेत. त्यानुसार ते देखील सगळ्यांची जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अक्षयने केलेली मदत पाहून इतरही लोकांची मदत करण्यासाठी पुढे सरसावतील याची त्यांना आशा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here