परभणीः राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे परभणीत ही दिवसागणित वाढत आहे. करोना बाधीत रुग्णांचा ताण कमी व्हावा यासाठी परभणीच्या मधुकर कांबळे या कलाकाराने थेट करोना कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांसमोर नृत्य व गीत सादर केलं. मधुकर कांबळे यांच्या नृत्यविष्कारानं बाधीत रुग्णांना अश्रू अनावर झाल्याचं चित्र होतं.

करोना कक्षात नातेवाईकांना बाधीत रुग्णांची विचारपूस करता येत नाही. त्याच करोना कक्षात मधुकर कांबळे यांनी चक्क नृत्य सादर करून बाधीत रुग्णांचं मनोबल उंचावण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला आहे. करोना रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी नृत्य आणि गीतांच्या माध्यमातुन कार्यक्रम सादर करण्याची इच्छा समई नृत्य वर्ल्ड रेकॉर्ड करणारे लोककलावंत मधुकर कांबळे यांनी व्यक्त केली होती. यास सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी त्यांना तात्काळ परवानगी दिली.

परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे मधुकर कांबळे यांनी नृत्य व गीतांच्या माध्यमातून रुग्णांचे मनोरंजन केले. रुग्णांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या उपक्रमाला दाद दिली तसंच त्यांचे अभिनंदनही केले. कोविड सेंटरमध्ये घरातील माणसं ही जवळ येऊ शकत नाहीत या काळात मधुकर कांबळेंनी आम्हाला आनंद दिला, अशा भावना रुग्णांनी व्यक्त केल्या. यावेळी रुग्णाच्या डोळ्यातील पाणी आणि चेहऱ्यावरील समाधान पाहून कार्यक्रमाचा उद्देश सार्थक झाल्याच्या भावना मधुकर कांबळे यांनी व्यक्त केल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here