चंद्रपूर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे आज (२५ एप्रिल) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. (former minister and bjp leader due to heart attack while having treatment on )

प्रथम संजय देवतळे यांच्या घरातील एका सदस्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर देवतळे यांची करोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर त्यांना नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले.

क्लिक करा आणि वाचा-
संजय देवतळे हे ४ वेळा वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा ते काँग्रेस पक्षात होते. ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तसेच त्यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा कारभारासुद्धा सांभाळला होता. पुढे सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केला होता. त्यावेळच्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. त्यानंतर २०१९ ची निवडणूक ते शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला होता.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here