नागपूरच्या दलालांकडून पाठवण्यात आलेल्या कॉल गर्लच्या माध्यमातून शेगावातील लॉजवर देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने बाळापूर रोडवरील हॉटेलमध्ये छापा मारला. त्यावेळी दोन जण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. शनिवारी रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. हॉटेलचा व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे (वय २३, राहणार शेगाव) आणि कुलदीप शिवाजी भाकरे (वय ३०, राहणार मोरगाव भाकरे, जिल्हा अकोला) या दोघांना पोलिसांनी अटक केली.
कोलकत्ता येथील एक युवती मागील ५ दिवसांपासून याच हॉटेलमध्ये राहात असून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले आहे. यावेळी आरोपींजवळून ४ हजार ४०० रुपये रोख आणि इतर आक्षेपार्ह वस्तू असा एकूण ४ हजार ४८० रपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या युवतीला न्यायालयासमोर हजर करून तिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times