जयंत सोनोने/अमरावती

टाळेबंदीमुळे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हजारो हात बेरोजगार झाले असतानासुद्धा जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या लोकांमध्ये जिवंत असल्याचा प्रत्यय अमरावतीत आला. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील मजुराने हजार दोन हजार नव्हे तर सापडलेले तब्बल लाखभर रुपये पोलिसांच्या स्वाधीन करून प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवून दिले. असे या प्रामाणिक मजुरीचे नाव आहे. ( the laborer returned notes of rs. 97500 setting an example of )

आपल्याला सापडलेल्या नोटा पोलीस स्टेशनला जमा करून आजही माणसात प्रामाणिकपणा जिवंत आहे याचे उदाहरण रामदास जिचकार या मजुराने घालून दिले आहे.

मोर्शी नजीक असलेल्या दापोरी येथील रामदास गोमाजी जिचकार (४५) हे सामाजिक वनीकरणने रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडाची निगा राखण्याकरिता रोजंदारीवर कामाला आहेत.

शुक्रवारी सकाळी दापोरी ते मायवाडी रस्त्यावरील झाडांना पाणी टाकण्याकरिता लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आणण्याकरिता गेले असता त्यांना त्या पाण्यामध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल चिखलामध्ये पडून असल्याचे आढळून आले. पाचशे रुपयाच्या एवढ्या नोटा पाहून त्यांच्या मनात स्वार्थ निर्माण न होता त्यांनी तेथील वनपाल एस. एस. काळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर रामदास यांनी सुनील फरकाडे यांच्यासोबत जाऊन या सापडलेल्या नोटा मोर्शी पोलीस स्टेशनला जमा केल्या. मोल मजुरी करणाऱ्या रामदास यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे मोर्शी पोलिसांनी त्यांचा सत्कार केला.

मोर्शी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नोटा एकूण ९७ हजार ५०० रुपयांच्या असून त्यातील काही नोटा पाण्याने खराब झालेल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आजच्या स्वार्थी युगात सुद्धा रामदास सारखे गरीब प्रामाणिकता दाखवत असल्याने अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येते, अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here