मुंबई: ‘ऑक्सीजनअभावी कोरोनाचे रुग्ण दररोज दगावत असल्याचे भयावह चित्र पाहून हायकोर्ट व सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारला अत्यंत कठोर शब्दात फटकारले. ऑक्सिजन प्रकरणात कोर्टात केंद्र सरकार प्रतिवादी होते राज्य सरकार नाही, हे भारतीय जनता पक्षाला माहीत असतानाही स्वतःच्या अब्रुरी लक्तरं वेशीवर टांगल्यानंतर आता यातही ते राजकरण करत आहेत. पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला जानेवारीतच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी निधी दिल्याची आठवण भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना आताच कशी झाली?, एवढे दिवस ते काय झोपा काढत होते का?, असे संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते यांनी विचारले आहेत. (how did the bjp just remember that the center had given funds to the state for the oxygen project asks congress spokesperson atul londhe)

ऑक्सीजन प्रकल्पासाठी केंद्र सरकाने पत्र दिले पण त्यासाठी लागणारे पैसे काही दिले नाहीत. भाजपा सरकार हे घोषणा करा, खोटे बोला पण रेटून बोला, जुमलेबाजी करा असे असून प्रत्यक्षात काहीही करायचे नाही. फक्त जुमलेबाजी करणे हा मोदी सरकारचा स्थायीभाव आहे, अशा शब्दात लोंढे यांनी तोशेरे ओढले आहेत.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला प्रचंड अपयश आले आहे. दररोज आप्तस्वकीय दगावत आहेत. भाजपाविरोधात लोकांमध्ये प्रचंड चिड व संताप दिसत आहे. भाजपाने करुन ठेवलेल्या या पापावर पांघरून घालण्यासाठी दररोज विरोधी पक्षांच्या सरकारांवर आरोप करून जबाबदारीतून हात झटकायचे आणि जनतेचा रोष कमी व्हावा म्हणून असे आरोप करून लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम भाजपाचे नेते करत आहेत. ऑक्सिजनअभावी लोक मरत आहेत, ही वस्तुस्थिती पाहून कोर्टाने भाजपा सरकारला, ‘चोरी करा, काहीही करा पण ऑक्सिजन पुरवा,’ एवढ्या कठोर शब्दात सुनावले पण त्याची यांना चाड नाही, असे म्हणत एवढे निर्ढावलेपण भाजपामध्ये येते कोठून?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती आहे. यावर मात करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. लसीकरण हे कोरोनावर प्रभावी ठरले आहे. जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे, पण मोदी सरकार मात्र ‘संकटात संधी’ पाहून लसीकरणातून नफेखोरी करत आहे. देशातील दोन कंपन्यांच्या लसीमधून एक लाख कोटी रुपयांची नफेखोरी करून देण्याचा धंदा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मांडला आहे. काही उद्योगपती मित्रांना फायदा व्हावा हाच यामागचा हेतू आहे. संकटात जनतेला वाऱ्यावर सोडून खिसे भरण्याचे पाप भाजपा सरकार करत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

७० वर्षात देशात पोलिओ, देवी सारख्या महामारीचे संकट आले असताना त्यावेळच्या काँग्रेस सरकारने कसलेही राजकारण न करता मोफत लसीकरण मोहिम देशभर राबविली आणि पोलीओ, देवी रोगाचे समूळ उच्चाटन केले, याची आठवण लोंढे यांनी करून दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here