म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

केल्याप्रकरणी १३ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या खटल्यात समाजवादी पार्टीचे नेते यांची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या रेकॉर्डिंगच्या सीडींपैकी एक रिकामी निघाली आणि एक सीडी न्यायालयातील लॅपटॉपमध्ये चालवता आली नाही. त्याचबरोबर एक कॅसेट चालवण्यासाठी काही साधनच नव्हते. शिवाय पोलिसांना गुन्हाही सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आझमी यांना त्यांच्याविरोधातील आरोपांतून निर्दोष मुक्त केले.

वाचा:

३ फेब्रुवारी २००८ रोजी सपाने शिवाजी पार्कवर सभा घेतली होती. त्यावेळी आझमी यांनी मनसेच्या परप्रांतीयांविरोधातील राजकारणावर टीका केली. भाषणादरम्यान त्यांनी महाराष्ट्रवासी व उत्तर प्रदेशवासीयांमध्ये जातीय तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर विधाने केली. तसेच दुसऱ्या दिवशी घाटकोपरमध्ये सपा कार्यकर्त्यांनी मनसे व मनसे अध्यक्ष यांचे पोस्टर व बॅनर फाडले, असा आरोप होता. आझमी यांच्या भाषणाची खातरजमा केल्यानंतर १० फेब्रुवारी २००८ रोजी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते.

वाचा:

मात्र, ‘एफआयआर नोंदवण्यात एक आठवडा विलंब झाल्याविषयी योग्य स्पष्टीकरण आलेले नाही. तसेच या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम ११७ (लोकांनी गुन्हा करण्यात सहभाग घेणे) लावले असले तरी किमान दहा जणांना आरोपी करणे आवश्यक असताना तसे करण्यात आलेले नाही. आरोपींचे भाषण हे राजकीय स्वरूपाचे होते आणि ते महाराष्ट्रातील लोकांच्या विरोधातील नव्हे तर मनसे व त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात होते, हे सिद्ध झाले आहे. एक लहान कॅसेट चालवणारे साहित्यही नाही. त्यामुळे रेकॉर्ड केलेले ते भाषण आरोपीचे आहे की नाही याविषयी संशय निर्माण होतो’, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने आझमी यांना निर्दोष ठरवले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here