नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवणुकीच मोठे यश संपादन करणाऱ्या यांच्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांसह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव यांनी देखील केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, हे अभिनंदन करत असताना विजयवर्गीय यांनी केजरीवाल यांना एक सल्ला दिला आहे. दिल्लीतील शाळांमध्ये, तसेच मदरशांमध्ये हनुमान चालीसाचा पाठ सुरू करावा असा असा सल्ला त्यांनी केजरीवाल यांना दिला आहे. हा सल्ला देताना दिल्लीतील मुलांनी बजरंगबलीच्या कृपेस वंचित का रहावे, असा सवाल करत केजरीवाल यांना टोला हाणला आहे.

कैलास विजयवर्गीय यांनी ट्विटद्वारे हा सल्ला दिला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘अरविंद केजरीवाल यांना विजयाच्या शुभेच्छा. जो कुणी हनुमानाला शरण जातो त्याला निश्चितपणे आशीर्वाद मिळतो. आता दिल्लीच्या शाळा, मदरशांबरोबरच सर्व शैक्षणिक संस्थामध्ये हनुमान चालीसाचा पाठ सुरू करणे गरजेचे बनले आहे. बजरंगबलीच्या कृपेस दिल्लीतील मुलांनी का बरे वंचित राहावे?’

भाजपच्या आक्रमक हल्ल्यानंतर हनुमानाची मदत

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी आपली हनुमानभक्ती दाखवली होती. मतदानापूर्वी केजरीवाल आवर्जून हनुमानाच्या दर्शनाला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या आक्रमक टीकेच्या वर्षावात टिकाव धरून राहण्यासाठी केजरीवाल यांना हनुमान चालीसा पाठ म्हणतानाही पाहिले गेले आहे. एकीकडे भाजप त्यांच्यावर तुटून पडत असताना दुसरीकडे केजरीवाल प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होते.

निकालानंतर गेले हनुमानास शरण
मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल आल्यानंतर केजरीवाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना सर्वप्रथम हनुमानाचे नाव घेतले. त्यानंतर केजरीवाल यांनी कनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली. हनुमान मंदिरांमध्ये जात केजरीवाल यांनी या पुढील काळातही आपण सौम्य हिंदुत्वाचा मुद्दा धरून ठेवू याचे संकेत दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here