: शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृत सोसायटीमधील ट्रॅव्हल्स कार्यालयात सामन्यांवर खेळणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली आहे.

शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीसांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी कारवाई केली. या कारवाई दरम्यान, क्रिकेट सामान्यांवर सट्टा खेळत असताना दोघे दिसून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नीलेश केशरीमल सोनी आणि अनिल नारायणदास बाजोरिया असे ताब्यात घेतलेल्या या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २ हजार रुपये रोख, एक टीव्ही, सेटअप बॉक्स, ६ मोबाइल असा एकत्रित ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींविरुद्ध रामदास पेठ पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकोला शहरात गेल्या आठवड्याभरात आयपीएल क्रिकेट सामान्यांवर सट्टा लावणाऱ्यांविरोधातील दुसरी कारवाई आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील, अनिनाश पाचपोर, विनायक धुळे, पूजा इंदौरे, अमित दुबेसह आदींनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here