मुंबईः देशातील १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना करोना लसीकरण करण्यास केंद्रानं मान्यता दिल्यानंतर राज्याचे कौशल्य विकासमंत्री यांनी १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण मोफत होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, एकीकडे पर्यावरण मंत्री यांनी मोफत लसीकरणाचं ट्वीट डिलीट केलं आहे. त्यामुळं मोफत लसीकरणावरुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील व्यक्तीचं मोफत लसीकरण करण्यात येईल व लसीकरणाचा खर्च राज्याच्या तिजोरीतून करण्यात येईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. तर, आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाचे अधिकृत धोरण समितीद्वारे घोषित केलं जाईल, असं म्हटलं आहे. या सगळ्या गोंधळावर संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

‘मोफत लसीकरण हा सरकारचा विषय आहे. जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. आदित्य ठाकरे हे कॅबिनेटचे सदस्य आहे इतरही काही सदस्य आहेत त्यामुळं हा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतला जाईल. संकटाचं राजकारण करण्याची गरज नाही. हे सरकार जीव वाचवण्यासाठीच प्रत्येक पाऊल टाकतंय,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. मुंबईसह राज्यात करोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळं राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम तरच संकटाला तोंड देता येईल. सध्याच्या काळात राजकारण करण्याची गरज नाही. महाविकास आघाडी संकट ही संधी मानून कधीच राजकारण करत नाही,’ असा टोला राऊतांनी विरोधकांना लगावला आहे.

‘महाराष्ट्रात ऑक्सिजनशिवाय कोणाचाही बळी गेला नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळं ऑक्सिजन प्लांटचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. अशाप्रकारचे घाणेरडे आरोप विरोधकांनी करु नये,’ असं म्हणत राऊतांनी विरोधकांना फटकारलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here