मुंबईः महाराष्ट्रात १८ वर्षांवरील लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री यांनी केली आहे. मात्र, नवाब मलिक यांच्या घोषणेनंतर ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये मोफत लसीकरणाबाबत मतभिन्नता असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे नेते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राज्यातील व्यक्तीचं करण्यात येईल व लसीकरणाचा खर्च राज्याच्या तिजोरीतून करण्यात येईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. तर, आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाचे अधिकृत धोरण समितीद्वारे घोषित केलं जाईल, असं म्हटलं आहे. यामुळं नवाब मलिक यांनी केलेल्या लसीकरणाच्या घोषणेमुळं काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी एक ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसला फटकारलं आहे.

वाचाः

संजय निरुपम यांनी ट्वीट केलं आहे. ‘राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे आणि मोफत लसीकरणाची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जातेय. थोडसं नेगळं वाटतंय. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण त्याची घोषणा सरकार करणार की फक्त एक घटक पक्ष करणार? या महामारीत श्रेय घेण्याचं राजकारण अत्यंत वाईट आहे. राष्ट्रवादीनं असे प्रकार करु नये, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. तसंच, अभी जरा बाज आएँ,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

वाचाः

नवाब मलिक काय म्हणाले होते?

महाराष्ट्र दिनापासून राज्यातील व्यक्तीस मोफत लसीकरण करण्यात येईल. या लसीकरणाचा खर्च राज्याच्या तिजोरीतून करण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. राज्यात करोनावरील लस मोफत उपलब्ध करून देण्याचा भाग म्हणून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जागतिक निविदा मागविण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला असून, याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिली आहे. राज्यातील जनतेच्या मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर जागतिक निविदा काढण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here