शहरातील समता कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून तब्बल ११९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले. २० वर्षीय मुलीने तिच्या मित्राच्या मदतीने चोरी केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. गाडगेनगर पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या मुलीसह तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेल्या घरातून डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्यांच्या कालावधीत सोन्याच्या दोन पाटल्या, १८ ग्रॅमची सोनसाखळी, ५० ग्रॅमच्या दोन बांगड्या असा एकूण ११९ ग्रॅम वजनाच्या सोन्याची चोरी झाली आहे. ही बाब आठ ते दहा दिवसांपूर्वी महिलेच्या लक्षात आली. या प्रकरणात महिलेने शनिवारी रात्री उशिरा गाडगेनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times