वाचा:
‘मुंबईत ४ एप्रिल रोजी ११,१६३ रुग्ण सापडले होते. आताचे चित्र पाहिल्यास २५ एप्रिलची आकडेवारी ५,५४२ रुग्ण इतकी आहे. मुंबईकर करोना नियमांचं पालन करताहेत. संयम दाखवाताहेत, याचा हा परिणाम आहे. करोना संसर्गाची साखळी तुटण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात, करोनाचा प्रादूर्भाव पूर्णपणे थांबलेला नसला तरी आकडा वाढू नये यासाठी मुंबईकर कटिबद्ध असल्याचं दिसत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या. ‘मुंबईत लॉकडाऊन सुरू आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळं बहुतांश मुंबईकर घरात बसत असल्याचं चित्र दिसतंय. हे चित्र कायम राहिल्यास ‘शाब्बास मुंबईकर’ असं म्हणण्याची वेळ लवकरच येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्या ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
वाचा:
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं राज्यातील यंत्रणांशी बोलत आहेत. केंद्र सरकारशी समन्वय साधून काम करत आहेत. आवश्यक त्या सूचना देत आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग खूपच कमी झालाय. तो शून्यावर यायला हवा. मागील वर्षी धारावीकरांनी करोनावर मात केली, तेव्हा जगभरातून कौतुक झालं, तसंच कौतुक मुंबईकरांच्या वाट्याला येईल. फक्त यापुढंही मुंबईकरांनी नियमाला धरून राहायला हवं,’ अशी अपेक्षा महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times