सीडीसीने म्हटले की, जवळपास पाच लाख लोकांनी अथवा मॉडर्नाचा पहिला डोस घेतलेल्या आठ टक्के लोकांनी आपला लशीचा दुसरा डोस घेतला नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करोनाची लागण झालेल्यांपेक्षा ही संख्या अधिक असल्याचे सीडीसीने म्हटले. सीडीसीने ९ एप्रिलपर्यंतच्या उपलब्ध माहिती आधारे म्हटले आहे.
वाचा:
करोना लशीकडे पाठ फिरवण्यामागे विविध कारणे असल्याचे समोर आले आहे. अनेकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोस घेतल्यास दुष्परिणाम जाणवण्याची भीती असल्याचे म्हटले. त्यामध्ये ताप येण्याच्या लक्षणांचा समावेश आहे. तर, अनेकांनी लशीच्या एकाच डोसमध्ये विषाणूपासून पुरेसं संरक्षण झाले असल्याचे सांगत दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवली. दुसरा डोस न घेण्यामागे आणखी एक कारण समोर आले. अनेक केंद्रावर लशींचा तुटवडा असल्याने अथवा इतर लस उपलब्ध असल्याने दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लोकांना लसीकरण केंद्रातून माघारी फिरावे लागले.
वाचा:
आर्कान्सा आणि इलिनॉयमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी लोकांनी लसीकरण केंद्रावर यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना एसएमएस, पत्र पाठवून दुसरा डोस घेण्याची आठवण करून दिली जात आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये उन्हाळ्याच्या सु्ट्टीत शैक्षणिक केंद्र बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसरा डोस उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दक्षिण कॅरिलोनामध्ये दुसरा डोस घेण्याची मुदत ओलांडलेल्या नागरिकांसाठी हजारो डोसची व्यवस्था केली आहे.
वाचा:
अमेरिकेत लसीकरण दरात घट होत असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे शनिवारी ५० हजार करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मागील उन्हाळ्यातील दुसऱ्या लाटेतही इतकीच बाधितांची नोंद करण्यात आली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times