मुंबई: राज्यातील करोनाची परिस्थिती हाताळण्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील करोनावर मात करण्यात कमी पडत असल्याने आम्हाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरावे लागत आहे. येथे कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच, देवेंद्र फडणवीस नागपूरात ठाण मांडून तेथील रूग्णसंख्या आटोक्यात आणली. नागपूरात अशी परीस्थिती असताना नागपूरबरोबरच देवेंद्रजी मुंबईतही वेळ देतात, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांची प्रशंसा केली आहे. (corona in nagpur came under control because of devendra fadnavis says praveen darekar)

कांदीवली येथील भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटर व नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे रविंद्र जोशी फाउंडेशन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांनी उभे राहिलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला. त्यानंतर दरेकर बोलत होते. यावेळी त्यांनी दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे झालेल्या कोविड सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमाचीही आठवण करून दिली.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील राज्यातील करोनाची स्थिती हाताळण्यात अपयशी झाले असल्याची टीका दरेकर यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात, तसेच मुंबई सारख्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गंभीर परिस्थिती असताना राज्य सरकार मात्र फक्त केंद्र सरकारवर टीका करण्यात व्यग्र आहे. एकीकडे सरकार केवळ आरोप करण्यात गुंतलेले असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे जनतेचे खरे प्रतिनिधी जनतेला विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत, असे दरेकर म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
असे परिश्रम करून लवकरात लवकर राज्याला आणि देशाला कोरोनामुक्त करू या, असेही प्रविण दरेकर म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here