जमीर खान नूर खान (५०, रा. हाजी बशीर नगर, वलगाव रोड, ) सैयद मकसुद सैयद महमूद (२९, रा. सुफियान नगर क्रमांक २) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मोहम्मद इक्बाल मो. एहसान (३०, रा. चमननगर, बडनेरा) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बडनेरा पोलिसांचे पथक जयस्तंभ चौकात गस्तीवर होते. दरम्यान एका रिक्षात काही जण गांजाची विक्री करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यावेळी पोलिसांनी रिक्षाजवळ जाऊन पाहणी केली. पोलिसांनी रिक्षाजवळ असलेल्यांकडे कसून चौकशी केली. त्याचवेळी एक जण पसार झाला. तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी २८ हजार रुपये किंमतीचा गांजा, एक लाख रुपये किंमतीची रिक्षा, २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी, एक मोबाइल असा एकूण १ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ठाणेदार पंजाबराव वंजारी, पीएसआय संजय आत्राम आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times