बीजिंग: करोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या भारताला मदतीचा हात देण्याची घोषणा करणाऱ्या चीनने पुन्हा एकदा धोका दिला असल्याची चर्चा सुरू आहे. चीनची सरकारी विमान कंपनी सिचुआन एअरलाइन्सने आपल्या सर्व कार्गो फ्लाइट्स १५ दिवसांसाठी स्थगित केल्या आहेत. या विमानांच्या माध्यमातून भारतासाठी अत्यावश्यक असणारी वैद्यकीय सामग्री पाठवण्यात येणार होती.

चिनी उत्पादकांनी ऑक्सिजन संबंधित उपकरणांच्या किंमती वाढवल्या ३५ ते ४० टक्के वाढवल्या असल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर भारतात सामग्री पाठवण्यासाठीचे शुल्कदेखील २९ टक्क्यांनी वाढवले आहे. शांघायमध्ये मालवाहतूक करणारी कंपनी सायनो ग्लोबल लॉजिस्टिकचे सिद्धार्थ सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले की, सिचुआन एअरलाइन्सच्या निर्णयामुळे दोन्ही देशांतील कंपन्या, उद्योगपतीदरम्यान ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करणे आणि भारतात पाठवणे यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे.

वाचा:

सिचुआन एअरलाइन्सचा भाग असलेल्या सिचुआन चुआनहांग लॉजिस्टिक कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केलेल्या निवेदनानुसार, विमान कंपनीने शिआन-दिल्लीसह सहा मार्गांवरील आपली कार्गो सेवा स्थगित केली आहे. हा निर्णय दोन्ही देशांमधील उद्योगजकांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याची चर्चा सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला. चीनची विमान कंपनी आगामी १५ दिवसांत आपल्या निर्णयाचा फेरआढावा घेणार असल्याचे कंपनीने म्हटले.

वाचा:
कंपनीने म्हटले की, करोना महासाथीच्या आजारामुळे भारतात झालेल्या अचानक बदलामुळे आयातीत घट झाली आहे. त्यामुळे आगामी १५ दिवस विमानाचे उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवाई मार्ग हा सिचुआन एअरलाइन्सचा मुख्य मार्ग असल्याचे कंपनीने म्हटले. या मार्गावरील सेवा स्थगित केल्यामुळे कंपनीला मोठे नुकसान होणार आहे. या निर्णयाबद्दल माफी मागत असल्याचे चिनी विमान कंपनीने म्हटले.

वाचा:
चीनकडून कार्गो विमाने स्थगित करण्यात आल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ही वैद्यकीय सामग्री भारतात आणणे आणखी आव्हानात्मक होणार आहे. या सामग्री सिंगापूर अथवा अन्य मार्गे पाठवल्या तरी अत्यावश्यक वैद्यकीय सामग्री पोहचण्यास उशीर होणार आहे. भारतातील करोना स्थितीचे कारण देत विमान स्थगित करणे आश्चर्यजनक असल्याचेही व्यापाऱ्यांनी म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here