मुंबईः केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा केल्याचा दावा विरोधी पक्षनेते यांनी केला होता. मात्र, काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (sachin sawant)

देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केलं होतं. महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्वीटवरुन काँग्रेसचे नेते यांनी निशाणा साधला आहे.

‘देवेंद्र फडणवीस जी, आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मेट्रिक टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.

‘महाविकास आघाडी सरकारने १५ ते ३० एप्रिल या १५ दिवसांत २५००० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. १७५०० मेट्रिक टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला ७५०० मेट्रिक टन म्हणजे ५०० मेट्रिक टन प्रतिदिन द्यायचे होते. परंतु ३४५ मेट्रिक टन प्रतिदिन मिळत आहे. उकलेल्यांसाठी वाहतूक अडचण येत आहे. कृपया खोटे बोलणे थांबवा,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.

तसंच, ‘सचिन सावंत यांनी महाराष्ट्राला मिळणाऱ्या ऑक्सिजनची आकडेवारीही ट्वीट केली आहे. महाराष्ट्राची ऑक्सिजन उत्पादन राज्यातील प्रकल्पाद्वारे १२५० मे. टन आहेत. केंद्राच्या मान्यतेनं प्राप्त होत असलेला ऑक्सिजम भिलाई ११० मेट्रिक टन/ प्रतिदिन, बेलारी ५० मे.टन / प्रतिदिन, जामनगर १२५ मे.टन/प्रतिदिन, व्हायजॅग -६० मे.टन सरासरी ऑक्सिजन एक्सप्रेसने ७ टँकरने एकदा ११० मे.टन आणले आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here