‘पॉझिटिव्हिटी कमी व्हायला हवी’
एखादी व्यक्ती सोशल डिस्टन्सिंग पाळत नसेल तर ती व्यक्ती ३० दिवसांत ४०६ जणांना बाधित करते. करोना पॉझिटिव्ह व्यक्ती आपल्यामुळे होणारा संसर्ग ५० टक्क्यांनी कम केला तर एका महिन्यात १५ आणि ७५ टक्क्यांपेक्षा कमी केल्यावर तीनहून कमी नागरिकांना बाधित करेल. होम आयसोलेशनमध्ये निरोगी व्यक्ती मास्क घातला आहे आणि करोना बाधित मास्क घातला नसेल तर त्यामुळे संसर्गाचा धोका हा ३० टक्के असेल. जर बाधिक व्यक्ती आणि निरोगी व्यक्तीने मास्क घातला असेल तर संसर्गाचा धोका हा १.५ टक्के इतका असेल, असं डॉ. पॉल म्हणाले.
१२ राज्यांमध्ये ९० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस
देशात आतापर्यंत १४ कोटींहून अधिक नागरिकांनी लसीचे डोस घेतले आहेत. १ कोटींहून अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. झारखंड, गुजरात, छत्तीसगड अशा १२ राज्यांमधील ९० टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी करोनावरील लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. ऑक्सिजनचा योग्य आणि काळजीपूर्वज उपयोग केला पाहिजे. ऑक्सिजनची गळतीही आपण रोखली पाहिजे, अशी सूचना सरकारने केली आहे.
‘करोनाला घाबरू नका’
करोनाला संसर्गाला घाबरण्याची गरज नाही. यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होईल. नागरिक फक्त भीतीने हॉस्पिटल्सचे बेड बुक करत आहेत. पण नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं. रेमडेसिवीरसारखी औषधं फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतली पाहिजे, असं डॉक्टर पॉल यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times