अकोला: करोना उद्रेकाच्या काळात घेण्याचे महत्व सांगितले जाते. हे लक्षात घेत अकोल्यातील अभ्युदय फाउंडेशनने पातूर येथे स्टीम सेंटर सुरू केले आहे. हे राज्यातील पाहिले आयुर्वेदिक स्टीम सेंटर आहे. नागरिकांना या सेंटरवर निशुल्क वाफारा देऊन त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

पातूरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने कोरोना काळात अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आयुर्वेदिक स्टीम सेंटर पातूर येथे उभारले आहे. ग्रामिण भागातील नागरिकांना वाफ घेण्याचे फायदे समजावणे तसेच त्यांना वाफ कशी घ्यावी याबाबत माहिती या केंद्रावरून देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी पाच स्टीमर ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये आयुर्वेदिक औषध टाकून नागरिकांना वाफारा देण्यात येत आहे. नागरिकांनी दररोज वाफ घ्यावी याबाबतही अभ्युदय फाउंडेशन जनजागृती करीत आहे. वाफ घेतल्यानंतर छातीत असणारा चिवट कफही मोकळा होऊ शकतो. कोरोनाला रोखण्यासाठी नियमित वाफ घेणे महत्वाचे आहे, असा दावा अभ्युदय फाउंडेशनने केला आहे. तसेच सातत्याने वाफ घेत राहिल्यास सहरीरातील ऑक्सिजन लेव्हल कायम राहते अशी जनजागृती करण्याचे काम या केंद्रावर सुरु आहे.

या सेंटरचा लोकार्पण सोहळा सोमवार, दिनांक २६ एप्रिल रोजी पार पडला. पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उदघाट्न पार पडले. यावेळी पातूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव, नायब तहसीलदार ए. एफ. सैय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवाळे साहेब, ग्रामविस्तार अधिकारी राहुल उंद्रे, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत उपस्थित होते. पहिल्याच दिवशी नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पातूर येथिल तहसील कार्यालय येथे या सेंटर चे उदघाट्न पार पडले. उद्यापासून हे आयुर्वेदिक स्टीम सेंटर नगर परिषद शाळा क्रमांक २ येथे नागरिकांसाठी निशुल्क सुरु राहणार आहे. या अभिनव सेंटर च्या उभारणीसाठी अभ्युदय फाउंडेशनचे डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन शुभम पोहरे, प्रा.चंद्रमणी धाडसे, प्रा. नरेंद्र बोरकर, शुभम उगले, विलास देवकर, संतोष लसनकर आदींनी अथक परिश्रम घेतले. या सेंटरसाठी बालाजी मेडिकलचे संचालक शुभम उगले यांनी सहकार्य केले.

(
वाफ घेतल्याने करोना रोखता येतो असे मटा ऑनलाइनचे म्हणणे नाही. करोनाच्या काळात अकोल्यात राज्यातील पहिले आयुर्वेदिक स्टीम सेंटर उभारले गेले ही माहिती जनतेपर्यंत पोहोचावी हाच उद्देश)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here