पुणे: शहर आणि जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य औद्योगिक कंपन्यांमध्ये असलेले जम्बो आणि छोटे सिलेंडर ताबडतोब जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जम्बो आणि छोटे सिलेंडर बेकायदा अन्य कारणांसाठी वापरल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरूद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ( )

वाचा:

जिल्हयातील उत्पादक, पुरवठा वितरण व रिफीलर्स यांच्याकडे अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग; तसेच या उद्योगांशी संबंधित उद्योग वगळता अन्य उद्योगांच्या ठिकाणी विनावापर पडून असलेले जम्बो सिलेंडर व छोटे सिलेंडर जमा करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग वगळून अन्य उद्योगांच्या ठिकाणी रिफिलर्सच्या मालकीचे विनावापर पडून असलेले जम्बो आणि छोटे सिलेंडर संबंधित उद्योग चालकांनी ऑक्सिजन रिफिलर्स यांचेकडे जमा करावे, असे आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत.

वाचा:
पुरवठादार यांनी सिलेंडर ताब्यात घेऊन त्याची नोंद ठेवावी. औद्योगिक वापराचे सिलेंडर हे सिलेंडरमध्ये रूपांतरित करून देणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here