मुंबई : प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. याआधी ३ एप्रिल रोजी एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. ( )

वाचा:

लसीकरणात देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

वाचा:

गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांच्या तुलनेत कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून आज २६ एप्रिल रोजी राज्यात ६१५५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण झाले. त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. लसीकरण केंद्रांचाही हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच आघाडीवर राहिले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.

सीएमओने केले ट्वीट

करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज आतावरची विक्रमी नोंद केली असून सायं. ६ पर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरच आपण दीड कोटींचा टप्पा गाठू, असे नमूद करत मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवरून यंत्रणांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here