/प्रतिनिधी

यवतमाळ पोलीस अधीक्षक नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन मित्रांकडे पैश्यांची मागणी केली. हा प्रकार लक्षात येताच एका जागरूक फेसबुक मित्राने रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली. त्यावरून सोमवारी सकाळी ते बनावट अकाऊंट बंद करून त्या भामट्या विरोधात शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचा फोटो सुध्दा या बनावट अकाऊंटसाठी वापरण्यात आला. ( in the name of )

पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या नावाने ‘एसपी यवतमाळ’ हे कार्यालयीन फेसबुक अकाऊंट आहे. अज्ञात एका भामट्याने ‘एसपी यवतमाळ’ नावाने एक नविन फेसबूक अकाऊंट तयार केले. त्यानंतर त्या अकाऊंटवरून चॅटिंग सुरू केली. त्याने जिल्हा पोलिस अधिक्षकांचा फोटो आणि नाव वापरले. दरम्यान त्या भामट्याने पोलिस अधिक्षकांचे मित्र व नातेवाइकांशी मॅसेंजरव्दारे संपर्क साधत आर्थिक अडचणीत आल्याचे सांगितले. मित्रांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर पैश्याची मागणी सुरू केली.

क्लिक करा आणि वाचा-
गुगल पे असेल तर अर्जंट पैसे पाठवा असे मॅसेज अनेकांना केले. या प्रकारामूळे एक फेसबुक मित्र गोंधळला आणि त्याने थेट पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती देत चौकशी केली. त्यावेळी एसपी यवतमाळ नावाने बनावट अकाऊंट तयार झाल्याची बाब निदर्शनास आली. या प्रकरणामूळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली.

क्लिक करा आणि वाचा-
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सोमवारी सकाळी पोलिसांनी ते बनावट अकाऊंट तात्काळ बंद केले. त्यानंतर यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शहर पोलिसांनी बनावट अकाऊंट बनवणाऱ्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. या प्रकरणी यवतमाळ जिल्हा सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलिस निरिक्षक अमोल पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर बनावट अकाऊंट बंद केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here