म.टा. प्रतिनिधी,

पुंडलिकनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये सुरू झालेल्या कोवीड सेंटरमधील १२ रूग्णांची ऑक्सीजन अभावी गुदमरून मृत्यु झाल्याची घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली. पुंडलिकनगर पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करून या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांची समजुत काढून ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत केला. (lives of twelve patients the saved because of )

सोमवारी दुपारच्या वेळेत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात सुभश्री हॉस्पीटलचे डॉ. उदयसिंग राजपुत हे पोहोचले. त्यांच्या दुर्गानंद हाईटस मध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी टाकले आहे. या कोविड सेंटरमध्ये १२ रूग्ण ऑक्सीजनवर आहेत. त्यांना ऑक्सीजन मिळाले नाही तर त्यांचा जीव जाईल. अशी तक्रार घेऊन आले होते. ही तक्रार येताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह पोलिस उपनिरिक्षक व्ही.जी. घोडके सह अन्य पोलिस कर्मचारी दुर्गानंद हाईटस येथे पोहोचले.

दुर्गानंद हाईटस येथे राहणाऱ्या १४ रहिवाशांनी हॉस्पीटलची लिफ्ट बंद केली होती. यामुळे ऑक्सीजनचा पुरवठा होत नव्हता. विशेष म्हणजे या रहिवाशांनी हॉस्पिटलच्या लिफ्टला लॉक लावून त्याची चावीही बिल्डर मगरे याच्याकडे दिली होती. या रहिवाशांनी या अपार्टमेंटमध्ये कोवीड सेंटर तयार केल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे. रूग्णांकडे येणारे नातेवाईक हे अपार्टमेंट परिसरात थांबलेले असतात. त्याच्यामुळे अस्वच्छता होत आहे. पार्किंगचाही त्रास होत आहे. या नागरिकांमुळे तसेच या पेशंटमुळे या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना होण्याचा धोका आहे अशी माहिती दिली.

क्लिक करा आणि वाचा-
सहाय्यक पोलिस निरिक्षक सोनवणे यांनी लोकांची समजूत काढली. बिल्डर मगरे यांना बोलावून लिफ्ट सुरू करून आधी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला. तसेच नागरिकांना या कोविड सेंटरबाबत जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांकडे तक्रार नोंदविण्याबाबत सांगितले. कोविड सेंटरमध्ये १२ रूग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याने, या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here