कोल्हापूर: अतिक्रमण काढल्याच्या रागातून समाजकंटकांनी पोलीस निरीक्षक संजय पतंगेचे घर पेटवल्याची घटना येथील पोलीस लाइन्स परिसरात घडली आहे. जमावानं पतंगे यांची खासगी गाडीही पेटवून दिली. या घटनेनंतर गारगोटी परिसरात खळबळ उडाली असून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

वाचा:

मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणातील संशयित सुभाष देसाई याला ताब्यात घेतल्याचे अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले. भुदरगड पोलीस कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात सुभाष देसाई यानं अतिक्रमण करून दुकानाचा गाळा काढला होता. हे अतिक्रमण संजय पतंगे यांनी काढले होते. त्याचा राग आल्यानं संशयित सुभाष देसाई यानं वसाहतीतील कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती. त्यानं रॉकेलचा कॅनही आणून ठेवला होता. मंगळवारी रात्री त्यानं पोलीस कर्मचारी वसाहतीत राहणारे पोलीस निरीक्षक पतंगे यांच्या मोटारीवर रॉकेल ओतून ती पेटवून दिली. त्यात ती जळून खाक झाली. त्यानंतर पतंगे यांच्या घरावरही रॉकेल ओतून ते पेटवून दिलं. आगीमुळं घराच्या हॉलच्या काचा फुटल्या. आतील फर्निचरला आग लागून मोठं नुकसान झालं.

वाचा:

पतंगे यांनी देसाई याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. त्याला बुधवारी सकाळी महागाव (ता. गडहिंग्लज) येथील त्याच्या बहिणीच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. देसाई हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्या विरोधात नागरिकांनी तक्रारी दिल्यास कारवाई केली जाईल, असे अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितलं.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here