केंद्र सरकारने राज्यांना जिल्ह्यांमध्ये छोटे-छोटे कंटेन्मेंट झोन बनवण्यास सांगितलं आहे. मोठ-मोठे कंटेन्मेंट झोन बनवण्यापासून दूर राहिलं पाहिजे. गरज पडल्यास पूर्ण पडताळणीनंतरच हे पाउल उचललं गेलं पाहिजे. किती नागरिकांना संसर्ग झाला आहे आणि किती भाग बंद केला पाहिजे, हे आधी निश्चित करावं. लॉकडाउन लावण्यापूर्वी एक नियमावली तयार करा. यामुळे लॉकडाउनचा उद्देश पूर्ण होण्यास मदत होईल, असं केंद्राने राज्यांना सांगितलं आहे.
केंद्राच्या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे…
> संचारबंदीचा कालावधी निश्चित करण्याची सूट स्थानिक प्रशासनाला द्यावी. रात्रीच्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करावी
> सामाजिक, राजकीय, क्रीजा, मनोरंजन, शिक्षण, सांस्कृतिक, धार्मिक आणि उत्सवांसारख्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालावी
> नागरिकांच्या भेटी-गाठी रोखल्यानेच करोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबवला जाऊ शकतो
> लग्न सोहळ्यांमध्ये ५० आणि अंत्यसंस्कारावेळी २० नागरिकांना परवानगी द्यावी
> शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, रेस्टॉरंट-बार, क्रीडा संकुल, जिम, स्पा, स्विमिंग पूल आणि धार्मिक स्थळांवर बंदी घालावी
> सर्वाजनिक आणि खासगी क्षेत्रातील आवश्यक सेवाच फक्त सुरू ठेवाव्यात
> ट्रेन, मेट्रो, बस आणि कॅब निम्म्या क्षमतेने चालवण्यास सूट देता येईल
> आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर बंदी घालून नये. आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अजिबात अडवू नका
> निम्म्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालय उघडण्यास सूट देता येईल
> कारखाने आणि संशोधनासंबंधीत संस्थांना सूट द्या, पण तिथे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन झाले पाहिजे. वेळोवेळी कर्मचाऱ्यांची रॅपिड-अँटिजेन चाचणी झाली पाहिजे
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times