अहमदनगर: कोपरगावातील भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि राज्यभरातील जुन्या वरिष्ट भाजप नेत्यांमध्ये संपर्क असलेले प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे (वय ७५) यांनी मंगळवारी सकाळी आत्महत्या केली. घरातच पंख्याला दोरीच्या सह्याने त्यांनी गळफास लावून घेतला. त्यांची लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी तूर्त अधिक माहिती देण्यास नकार दिला असला तरी मिळालेल्या माहितीनुसार घरगुती कारणातून शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. ()

वाचा:

शिंदे कोपरगावमधील सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. पंधरा वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. ते भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जात. काही काळ त्यांनी कोपरगावचे पक्षाचे शहराध्यक्ष म्हणूनही काम केले. माजी खासदार सूर्यभान पाटील वहाडणे, प्रा. ना. सं. फरांदे यांच्यासह राज्यभरातील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क होता.

वाचा:

मंगळवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, दोन नातवंडे असा परिवार आहे. शिंदे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे, मात्र तपासाचा भाग असल्याने त्याबद्दल अधिक माहिती देता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले तपास करीत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here