सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सेण्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सेन्सॉर बोर्ड) सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार, बोर्डाने निर्मात्यांना सिनेमातील काही सीन हटवण्यास सांगितले आहे. यातही सारा आणि कार्तिक यांच्यातील काही मेकिंग सीन हटवण्यास किंवा त्यांची लांबी कमी करण्यास सांगितले आहे.
असं म्हटलं जातं की, बोर्डाच्या आदेशानंतर कार्तिक- सारामधील किसिंग सीन सिनेमातून हटवण्यात आला आहे. याशिवाय बोर्डाने निर्मात्यांना इंटिमेट सीन ब्लर करण्यास सांगितले आहे. या सर्व अटींनंतर सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट देण्यात आलं. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्यासोबत रणदीप हुड्डा आणि आरुषी शर्मा यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या १४ फेब्रुवारीला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times