लॉकडाउन आणि संचारबंदीतही भर नागरीवस्तीत सुरू असलेल्या पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि दरोडा विरोधी पथकाने उद्ध्वस्त केला. यावेळी रोख रकमेसह चार लाख ३२ हजार रूपयांची गावठी आणि विदेशी दारू जप्त केली. ( business destroyed in )
शहरातील बेकायदेशीर धंद्यांबाबत पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर, त्यावर कार्यवाही केली जात नसल्याचे वृत्त मटाने प्रसिद्ध करून, या विषयाला वाचा फोडली होती. दरम्यान, कोंढवा परिसरातील श्रद्धा नगर येथे नागरी वस्तीत हातभट्टी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभाग, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने श्रद्धानगर येथे धाड टाकली.
यावेळी गावठी आणि विदेशी दारूसह ४ लाख ३२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिस आल्याचे समजातच आरोपी अनिल बिनावत आणि राहूल बिनावत पसार झाले. सुशिला दिलीप कुंभार (वय ६०) अरूणा राजकुमार कचरावत (वय ५०), अनिल शाम बिनावत आणि राहूल अनिल बिनावत अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार निरीक्षक शिल्पा चव्हाण, उपनिरीक्षक श्रीधर खडके, हवालदार राजश्री मोहिते, इरफान पठाण, आण्णा माने, नीलम शिंदे, मनीषा पुकाळे, पुष्पेंद्र चव्हाण, प्रफुल्ल गायकवाड, धनंजय ताजणे, प्रमोद मोहिते, मॅगी जाधव, गणेश ढगे, श्रीकांत दगडे यांच्या पथकाने केली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times