मुंबई: मुंबईची करोनामुळे होणारी मृत्यूसंख्या सातत्याने दडवण्याचे काम होत असल्याचे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईत सातत्याने करोना चाचण्या कमी होत असून त्यातही आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असून राज्यातील एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू मुंबईत होऊन सुद्धा जुन्या नोंदी अद्ययावत झाल्यानसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ( is hidden serious allegations made by )

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात हा मृत्यूसंख्या दडण्याचा आरोप केला आहे.

मुंबईत रिकन्सिलिएशनचे काम अजून पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्या नंतर टप्प्याटप्प्याने अधिक करून नेमके चित्र उभे राहणार नाही. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस पुढे लिहितात, ‘हीच परिस्थिती राज्यांमधील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. राज्यातील एकूण करोनाबळींच्या संख्येत एकट्या मुंबईत २० टक्के मृत्यू आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही. त्यामुळे मुंबईत तर चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढवाव्याच लागतील, शिवाय राज्याच्या अन्य भागात सुद्धा ‘टेस्ट, स्ट्रेस अँड ट्रीट’ हे तत्व काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. त्यातही केंद्रांच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे आरटीपीसीआर चाचण्यांचा पुरेसा समतोल राखण्यात यावा, हे पुन्हा एकदा मी आपल्या निदर्शनास आणून देत आहे.’

क्लिक करा आणि वाचा-

‘मुंबईत सजगतेने काम करण्याची गरज’

मुंबईच्या बाबतीत अतिशय सजगतेने काम करण्याची गरज आहे. याचे कारण म्हणजे मुंबईतून संक्रमिक लोक गावी गेले आहेत. गेल्या लाटेत त्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये करोनाचे प्रमाण वाढत असल्याचे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

महाराष्ट्र केंद्राचे निकष पाळत नाही- फडणवीस

राज्यात जवळजवळ ४० टक्के चाचण्या अँटिजेन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे २६ एप्रिल रोजी नोंदवलेल्या मुंबईतील २८ हजार चाचण्यांमधील ४० टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ १६,८०० आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. रविवारी २५ एप्रिल रोजी राज्यात एकूण २,८८,२८१ चाचण्या नोंदविण्यात आल्या. त्यातील १,७०,२४५ आरटी-पीसीआर चाचण्या होत्या (५९ टक्के), तर १,१८,०३६ चाचण्या या रॅपिड अँटीजेन म्हणजे एकूण ४१ टक्के. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या वर हवे, असे केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सांगितले जात असताना सुद्धा त्याचे पालन होताना दिसत नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here