आज राज्यात एकूण ८९५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४२४ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ६७ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३६ लाख ६९ हजार ५४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२१ टक्क्यांवर आले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या किंचित घटली
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७२ हजार ४३४ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून येथे राज्यात सर्वाधिक १ लाख ०४ हजार ५६१ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ६८ हजार ६०३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ७२ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७५ हजार २१९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजार ०६१ इतकी आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times