राज्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा कोटा वाढवला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये देशात रोज ५७०० मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती होत होती. यात वाढ होऊन २५ एप्रिल २०२१ पर्यंत ८,९२२ मेट्रीक टन करण्यात आले आहे. एप्रिल अखेरपर्यंत देशात रोज ९२५० मेट्रीक ऑक्सिजनची निर्मीती होईल, असं अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं.
या उच्चस्तरीय बैठकीत हॉस्पिटलमधील बेड्स आणि आयसीयू बेडची संख्या वाढवण्याबाबत करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती आरोग्य सुविधा आणि करोनासंबंधी व्यवस्थापन करणाऱ्या गटाने पंतप्रधान मोदींना माहिती दिली. करोनासंबंधीच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक सूचना आणि धोरण योग्य प्रकारे लागू करण्याची गरज आहे. नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्याचे काम सुरू आहे. यासोबतच ऑक्सिजन एक्स्प्रेस , भारतीय हवाई दलाकडून ऑक्सिनजचा तुटवडा दूर करण्यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली.
देशात ३,२३,१४४ नवीन रुग्ण नोंदवण्यात आले. २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून रोज सकाळी देण्यात येते. यानुसार देशातील २७७१ जणांचा करोनाने या काळात मृत्यू झाला. तर करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २८,८२,२०४ वर पोहोचली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times