सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इंदापूरला वळवण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू येथे आज सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उजनी पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापनाही करण्यात आली. या संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली भविष्यात दीर्घकालीन लढा लढण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व करणारे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे ५ टीएमसी स्वतःच्या इंदापूर तालुक्याला पळवले आहे. याचा निषेध म्हणून १ मे ला महाराष्ट्र दिनी सोलापूर येथे त्यांनी झेंडा फडकवू नये अशी मागणीही आजच्या बैठकीत करण्यात आली. त्यांनी झेंडा फडकवल्यास या पाणी चोरीचा निषेध म्हणून उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे सदस्य उजनी धरणामध्ये जलसमाधी घेणार असल्याचा इशारा पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावरील अनेक पाणी पुरवठा योजना निधी अभावी रखडलेल्या आहेत. उजनी धरणातील पाण्याचे १०० टक्के वाटप पूर्ण झालेले आहे. धरणात पाणी शिल्लक नसताना सुद्धा इंदापूरला पालकमंत्री भरणे यांनी पाणी चोरून नेले आहे. यामुळे भविष्यात सोलापूर जिल्हावासियांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे बैठकीत मांडण्यात आले. या मुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रही निम्मे कमी होऊ शकते. या विरुध्द जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार व आमदारांनी या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला सर्वांनुमते अनुमोदन देण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times