वाचा:
मतमोजणी केंद्रावर गर्दी झाल्यास आधीच करोना स्थिती गंभीर झालेल्या पंढरपूरमध्ये स्थिती अधिक भीषण होऊ शकते, हे ध्यानात घेऊन कठोर पावले टाकली जात आहेत. पोलीस प्रशासन आता कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करणार असून मतमोजणी केंद्राकडे येणारे सर्व रस्ते बॅरिगेटिंग करून बंद केले जाणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोणालाही मतमोजणी केंद्राकडे येऊ दिले जाणार नसल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
वाचा:
मतमोजणी वेळी उमेदवारांच्या कमीत कमी प्रतिनिधींना करोनाचे नियम पाळून मतमोजणी केंद्रात सोडले जाणार असल्याचेही सातपुते यांनी सांगितले. मतमोजणी वेळी अनावश्यक गर्दी होऊन पुन्हा करोनाचा फैलाव होऊ दिला जाणार नसल्याचे तेजस्वी सातपुते यांनी ठामपणे सांगितले.
वाचा:
निकालाकडे सर्वांचे लक्ष
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे करोनाने निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. १७ एप्रिल रोजी येथे मतदान पार पडले. येथे राष्ट्रवादी कडून भारत भालके यांचे पुत्र मैदानात आहेत तर भाजपकडून हे नशीब आजमावत आहेत. निवडणुकीच्या आखाड्यात आणखीही उमेदवार असले तरी या दोघांतच मुख्य लढत झाली आहे. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपसाठीही प्रतिष्ठेची असल्याने निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times