वाचा:
जिल्ह्यात मंगळवारी १४०९ करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे एकूण करोनामुक्त व्यक्तींची संख्या एक लाख पाच हजार ६४१ वर पोहचली आहे. सध्या जिल्ह्यात १२ हजार ४९८ करोना बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान, सोयगाव तालुक्यातील पावरी गावातील अवघ्या एका महिन्याच्या करोना बाधित बालकाला २१ एप्रिलला घाटीत दाखल करण्यात आले होते. श्वसनविकार, न्यूमोनिया, मेंदूविकार आणि अन्य गंभीर गुंतागुंतीमुळे संबंधित बालकाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
वाचा:
राज्यातील मंगळवारची करोनाची स्थिती
– राज्यात ८९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
– ६६ हजार ३५८ नवीन रुग्णांचे निदान तर ६७ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी
– राज्यात आजपर्यंत एकूण ३६ लाख ६९ हजार ५४८ करोना बाधित रुग्णांची करोनावर मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.२१ एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६२ लाख ५४ हजार ७३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४ लाख १० हजार ८५ (१६.८० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले..
– सध्या राज्यात ४२,६४,९३६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३०,१४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
– राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७२ हजार ४३४ वर.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times