नवी दिल्लीः देशात करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरण मोहीमेत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड ( ) आणि भारत बायोटेकची दिली ( covaxin ) जात आहे. आता या दोन्ही लसी करोनाच्या भारतीय व्हेरियंटवर प्रभावी आहेत, आणि लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास सौम्य लक्षणं दिसून येतात. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत जीनोमिक्स आणि एकीकृत जैवविज्ञान संस्थेचे (IGIB) संचालक अनुराग अग्रवाल यांनी एका अभ्यासाच्या प्राथमिक निष्कर्षावरून हा दावा केला आहे. sars-cov-2 च्या बी. 1.617 व्हेरियंटवर लसीच्या प्रभावाचा अभ्यास केला. लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास आजाराची लक्षणं सौम्य असतात, असं अग्रवालम म्हणाले.

करोना व्हायरसच्या बी. 1.617 या भारतीय व्हेरियंट डबल म्युटंटचा असल्याचं बोललं जातंय. देशातील करोनावरील लसीकरणात सध्या वापरात असलेल्या दोन्ही लसी यावर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

देशात करोनावरील लसीकरण मोहीमेत आतापर्यंत १४.७७ कोटी नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी २४ लाख डोस हे मंगळवारी देण्यात आले. मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत १४,७७,२७,०५४ इतके डोस दिले असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. मंगळवारी १५,०१,००२ लाभार्थ्यांनी पहिला आणि ९,५४,८६७ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशात करोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, औषधं आणि लसीचा तुटवडा आहे. केंद्र आणि राज्य सरकारे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बेल्जियम, रोमानिया, लक्समबर्ग, पोर्तुगाल आणि स्वीडनसह अनेक देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here