चंदिगडः पंजाबचे मुख्यमंत्री यांनी मंगळवारी माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना पतियालाळातून आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे.

नवज्योतसिंग सिद्धूंना आपल्याविरोधात निवडणूक लढवायची असेल तर ते स्वतंत्र आहेत. पण त्यांचे नशीबही जनरल जे. जे. सिंग यांच्यासारखे होईल. जनरल सिंग हे शिरोमणी अकाली दलाच्या तिकीटावर अमरिंदर सिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांचं डिपॉझिट जप्त झालं.

‘काँग्रेसमध्ये आहात की नाही? सिद्धूंनी स्पष्ट करावं’

काँग्रेसचे सदस्य आहेत की नाही? हे नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्पष्ट करावं. असतील तर मग मुख्यमंत्री आणि सरकारविरोधातील त्यांच्या सततच्या वक्तव्यांवरून पक्षातील शिस्तभंग मानला जाईल. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने आपला भूमिका स्पष्ट करावी. कारण ते पक्षातील शिस्त तोडण्यात व्यग्र आहेत. भाजप त्यांना पुन्हा घेणार नाही. शिरोमणी अकाली दलही त्यांना त्यांच्यावर संतप्त आहे, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचं अमरिंदर सिंग यांनी कौतुक केलं. जाखड हे पक्षासाठी चांगलं काम करत आहेत आणि आपली जबाबदारी पूर्णपणे उत्तम प्रकारे पार पाडत आहे. यामुळे सिद्धू यांची सुनिल जाखड यांच्यापदी नेमणूक होण्याचा प्रश्नच येत नाही, असं अमरिंदर सिंग यांनी म्हणाले.

सिद्धू यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून काँग्रेसचं नाव हटवलं. यासोबतच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात वक्तव्य केलं आहे. कोटकपुरा आणि बहिबल कलां गोळीबार प्रकरणी एसआयटी चौकशी रद्द केल्याने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. हम तो डुबेंग सनम, तुम्हे भी ले डुबेंगे, असं सिद्धूंनी सोशल मीडियावर लिहिलं. हे सरकार आणि पक्षाचे अपयश आहे. पण एका व्यक्तीने दोषींसोबत हातमिळवणी केली आहे, असं सिद्धू म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here