ऑक्सिजन अभावी सोमवारी जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. त्यावर खट्टर यांनी उत्तर दिलं. उपलब्ध पायाभूत सुविधांच्या मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजेत, असं खट्टर म्हणाले. एका खासगी हॉस्पिटलमध्ये झाला. या मृत्युंना हॉस्पिटल प्रशासनाने ऑक्सिजनच्या अभावाचं कारण सांगितलं. प्रशासनाने हा दावा फेटाळून लावत या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
करोनातून नागरिक लवकर बरे कसे होतील, यावर आपण लक्ष केंद्रीय केले पाहिजे. कितीही आरडाओरड केली तरी आपण मृतांना परत आणू शकत नाही. मृतांच्या संख्येवर चर्चा करणं व्यर्थ आहे. ही महामारी आहे. याबद्दल तुम्हाला आणि आपल्याला कुणालाच काहीच माहिती नाही. आम्हाला आणि आपल्याला आणि करोना रुग्णांना यावेळी सहकार्याची आवश्यकता आहे, असं खट्टर यांनी सांगितलं.
हरयाणात सोमवारी करोना व्हायरसने ७५ जणांना मृत्यू झाला. ११,५०४ नवीन रुग्ण आढळून आले. पण अनेक राज्य आपली कामगिरी चांगली दाखवण्यासाठी मृतांची संख्या लपवत असल्याचा आरोप होतोय. आम्ही प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मृत्यू कमी झाले की अधिक हे म्हणणं व्यर्थ आहे, असं मनोहरलाल खट्टर म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times