अहमदनगर: येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत प्राथमिक अंदाजानुसार कोट्यवधी रुपयांचा कापूस आणि धान्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारणे अद्याप स्पष्ट होई शकले नाही. काही तास अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. (Fire at Maharashtra State Warehousing Corporation Godown in )

संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे हे गोदाम आहे. तेथे कापसाचा मोठा साठा होता. याशिवाय गहू, सोयाबीन, मका, हरभरा यांची पोतीही होती. रात्री तेथे अचानक आग लागली. याची माहिती मिळून यंत्रणा पोहोचेपर्यंत आग पसरत गेली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या असल्याचा अंदाज आहे. वखार महामंडळाचे कनिष्ठ अधीक्षक गिरीश कुलकर्णी यांच्या माहितीनुसार आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तेथील बहुतांश धान्य साठा जळून खाक झाला आहे. आगीचे कारण त्यांनाही अद्याप सांगता आलेले नाही.

वाचा:

आग लागल्याचे समजताच संगमनेर नगर परिषद व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या या तातडीने बाजार समितीच्या आवारात दाखल झाल्या. त्यांनी या गोदामाच्या चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. जेसीबीच्या साहाय्याने भिंती पाडून आत पाणी मारण्यात आले. मात्र आग अटोक्यात येण्यासाठी रात्री इशिरापर्यंत अथक प्रयत्न करावे लागले. संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीचे स्वरूप पहाता प्रवरा नगर, राहता, राहुरी या ठिकाणाहून आग्निशामक दलाची मदत बोलाविण्यात आली.
सुमारे एक एकर परिसरातील या गोदामातून मोठ्या प्रमाणात कापूस, रिकामा बारदाना आणि धान्य होते. बारदाना आणि कापसाने लवकर पेट घेतला आणि आग पसरत गेली. आगीच्या ज्वाळांमळे छताचे पत्रे उडून पडले. घटनास्थळी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला यंत्रणा कमी पडत असल्याने आग पुन्हा पुन्हा भडकत होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here